sexual assault case file photo
बेळगाव

Belgaum sexual assault case: लैंगिक अत्याचार; एकाला 30 वर्षे सक्तमजुरी

लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकाला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन विकून तिला बाहेरगावी नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकाला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या. सी. एम. पुष्पलता यांनी बुधवारी (दि. 8) हा निकाल दिला. शिवानंद बसवराज डोनी (वय 26, रा. लोळसूर, ता. गोकाक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, शिवानंदने 8 मार्च 2025 रोजी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतले. तिला वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्याच गळ्यातील सोन्याची चेन विकली. त्यानंतर त्याने तिला बळ्ळारीत नेऊन अनेक दिवस लैंगिक अत्याचार केले. मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पालकांना दिली. पालकांनी घटप्रभा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक सी. डी. मुल्ला यांनी या प्रकरणाचा तपास करुन शिवानंदवर पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी न्यायालयात आठ साक्षी, 50 कागदोपत्री पुरावे आणि तीन मुद्देमाल तपासले. त्यात शिवानंद दोषी आढळला. त्यामुळे, न्यायाधीशांनी आरोपीला 30 वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. दंड भरला नाही तर दोन वर्षे अतिरिक्त शिक्षा भोगण्याचा आदेश दिला आहे. पीडित मुलीला जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाकडून 4 लाख आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले आहेत. सरकारी वकील म्हणून ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT