Fraud Case 
बेळगाव

Belgaum RTO Challan Fraud: आरटीओ चलनाच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक

तुमचे आरटीओ चलन भरणे बाकी आहे, अशा आशयाची एपीएके फाईल पाठवून त्याद्वारे बँक खाते हॅक करत अडीच लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तुमचे आरटीओ चलन भरणे बाकी आहे, अशा आशयाची एपीएके फाईल पाठवून त्याद्वारे बँक खाते हॅक करत अडीच लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली. या प्रकरणी जिल्हा सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.

गोकाक येथील गजानन नामक व्यक्तीच्या व्हॉटस्ॲपवर एक फाईल आली. त्यामध्ये तुमच्या वाहनाची मुदत संपली असून आरटीओ चलन भरण्याचे आहे, असे दिसून आले. त्यामुळे गजानन यांनी सहजरित्या त्या फाईलवर क्लिक केले. क्लिक करताच आधी त्यांचा मोबाईल हॅक झाला. काही वेळातच त्यांच्या खात्यावरील तब्बल २ लाख ४४ हजार रूपयांची रक्कम गायब झाली.

२ जून रोजी घडलेल्या या घटनेची त्यांनी जिल्हा सीईएनला माहिती दिली आहे. याचा तपास केला असता सायबर भामट्यांनी ही रक्कम विविध खात्यांवर वर्ग केल्याचे आढळून आले. तुमच्या मोबाईलवर कोणतीही एपीके फाईल आल्यास कृपया त्यावर क्लिक करू नका, ही भामट्यांनी पाठवलेली फाईल असू शकते. त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT