laptop File photo
बेळगाव

Revenue department upgrade: महसूल निरीक्षक, तलाठ्यांना लॅपटॉप

महसूल खात्याच्या डिजिटलकरणाला वेग : कामे होणार त्वरित आणि पारदर्शी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महसूल खात्याने आधार जोडणीसह भूमी, मोजणी, एएसके ही महसूल खात्याची संकेतस्थळे विकसित केली होती. आता त्यांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. यासाठी महसूल निरीक्षक, तलाठी यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. यातून विभागाचे पूर्णपणे डिजिटलकरण करण्यात येणार आहे.

महसूल विभागाशीसंबंधित सर्व सेवा पारदर्शक करण्यात येत आहेत. यासाठी डिजिटलकरण करण्यात येत असून शेतकऱ्यांना त्वरित माहिती मिळणार आहे. यासाठी ई-ऑफिस ही संकल्पना गावपातळीवर विस्तारित करण्यात येत आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे.

सध्या कार्यरत असणाऱ्या महसूल खात्याच्या भूमी संकेतस्थळावर स्वयंचलित म्युटेशन सेवा उपलब्ध आहे. एखाद्या अर्जाचा नोटीस कालावधी पूर्ण होताच मानवी हस्तक्षेपाशिवाय डिजिटल सहीच्या माध्यमातून अर्जाला मंजुरी मिळते. नोटीस कालावधीत महसूल निरीक्षक किंवा लोकांकडून तक्रार दाखल केल्यास म्युटेशन पूर्ण होत नाही. आरसीसीएमएस संकेतस्थळावरुन हे प्रकरण तहसीलदार न्यायालयात वर्ग होते. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, महसूल खात्याशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा महसूल निरीक्षक, तलाठी यांना लॅपटॉपची मदत घेत पुरवणे शक्य होणार आहे. यासाठी कार्यालयात मारावे हेलपाटे चुकणार आहेत. त्याचबरोबर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनाही कोठूनही सुविधा पुरवणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT