Fraud Case 
बेळगाव

Belgaum Financial Fraud: तुरमुरीतील निवृत्त शिक्षकाची सव्वादोन लाखांची फसवणूक

जुनी नाणी विकत घेण्याच्या बहाण्याने एका निवृत्त वृद्ध शिक्षकाची सुमारे २ लाख ३० हजारांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जुनी नाणी विकत घेण्याच्या बहाण्याने एका निवृत्त वृद्ध शिक्षकाची सुमारे २ लाख ३० हजारांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सीईएन पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

सदर निवृत्त शिक्षक तुरमुरीतील असून त्यांनी आपल्याकडे असलेली जुनी नाणी सोशल मीडियावर अपलोड केली होती. ते पाहून एका भामट्याने ही नाणी आम्ही जादा दराने विकत घेऊ, असे म्हणत संबंधितांशी संपर्क साधला. यानंतर त्यांचा संवाद होऊ लागल्यानंतर त्याने जुन्या नाण्यांसाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवले. यासाठी काही तांत्रिक कारणे सांगत आधी ७५० रुपये त्यानंतर १२ हजार असे करत टप्प्याटप्प्याने सदर व्यक्तीच्या खात्यावरुन २ लाख ३० हजाराची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी त्यांनी शनिवारी सीईएन ठाणे गाठून फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT