online fraud pudhari photo
बेळगाव

Belgaum Online Fraud: रायबागमधील एकाची ४.५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

बेळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : डिजिटल पेमेंट करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असतानाच रायबागमधील एका व्यक्तीला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे तब्बल ४ लाख ५३ हजार १६७ रुपये परस्पर वर्ग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बेळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार बजंत्री यांचे रायबागमधील बँकेत बचत खाते आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असून ते फोन पे आणि गुगल पे या डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करतात. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान त्यांच्या खात्यातून संशयास्पद ऑनलाईन व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांद्वारे खात्यातील ४ लाख ५३ हजार १६७ रुपये अन्य खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बजंत्री यांनी बँकेशी संपर्क साधून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT