बेळगाव : शहरात हेस्कॉम सोमवारी (दि. ३) दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
शहरात आझादनगर, जुने गांधीनगर, दिपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट रस्ता, जुना पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, टी. व्ही, सेंटर, मुख्य बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, किर्ती हॉटेल परिसर,
वनखाते कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस गल्ली, शनिवार खुट, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एसी मोटर्स, मारुतीनगर, दरबार गल्ली, आझाद गल्ली, तेंगीनकर गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली या भागात वीजपुरवठा ठप्प होणार आहे.