बेळगाव

Belgaum Policeman Death: कर्तव्यावर असतानाच पोलिसाचा हृदयाघाताने मृत्यू

मृत पोलिस गोकाकचा : केवळ १८ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्तव्यावर असताना पोलिस हवालदाराचा तीव्र हृदयाघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिमोग्यात नुकतीच घडली. इरण्णा गुडधर (वय २६) असे मृत हवालदाराचे नाव असून ते मूळचे गोकाक तालुक्यातील आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, इरण्णा गेल्या सात वर्षांपासून केएसआरपीच्या (कर्नाटक राखीव दल) आठव्या बटालियनमध्ये कार्यरत होते. मंगळवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडून ते कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

इरण्णा यांचा अवघ्या १८ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT