Belgaum Ganeshotsav 
बेळगाव

Belgaum Ganeshotsav : सर्व पोलिस ठाण्यांमध्ये एक खिडकीची सोय

गणेशोत्सव परवानगीची सोय : महापालिका, अग्निशामक, हेस्कॉमचेही अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांना गणेशोत्सवासाठीची परवानगी एकाच छताखाली मिळावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक खिडकी सुरु केल्याची माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शहर व आयुक्तालयाच्या अखत्यारितील बारा ठाण्यांतील एका कर्मचाऱ्याकडे ही जबाबदारी दिली आहे. याच ठिकाणी महापालिका, हेस्कॉम व अग्निशामक दलाच्या परवानगीचीही सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेणे सोपे व्हावे, यासाठी एक खिडकीची सोय केली जाते.

यंदा प्रत्येक पोलिस ठाण्यात ती सोय केली असून मंडळांनी आपापल्या ठाणा हद्दीतील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT