बेळगाव

बेळगावकरांनी पाहिला सुपर ब्लू मून

backup backup

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी (दि. 30) सायंकाळी 8:45 वाजता ऑगस्ट महिन्यातील दुसरा ब्लू मून बेळगावकरांनी पाहिला. ही एक खगोलीय घटना असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ही घटना तीन वर्षांतून एकदाच घडते. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना बुधवारी घडली.

बुधवारी पूर्ण चंद्र, सुपरमून आणि ब्लू मून या तिन्ही खगोलीय घटना एकत्र घडल्या. याला 'सुपर ब्लू मून' म्हणतात. 1 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी पौर्णिमा दोनदा आली. खरं तर पौर्णिमा ही महिन्यातून एकदाच येते. असे क्वचितच घडते. शास्त्रज्ञांनी 1 ऑगस्टच्या पौर्णिमेला सुपर मून म्हटले आहे आणि 30 ऑगस्टच्या पौर्णिमेला ब्लू मून म्हटले आहे. यानंतर पुढील ब्लू मून 2026 मध्येच दिसेल.

SCROLL FOR NEXT