Karnataka Hindalga Prison 
बेळगाव

Hindalga Prison Viral Video: नग्न कॉलप्रकरणी दोघांवर गुन्हा

दोघेही सराईत गुन्हेगार; हिंडलगा कारागृह प्रशासन म्हणते व्हिडीओ बनावट

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : एका महिला पोलिस अधिकाऱ्याने हिंडलगा तुरुंगातील कैद्याशी अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केल्याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संताप व्यक्त होत असून त्या व्हिडीओतील महिला अधिकाऱ्याने बंगळूरमधील कब्बन पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगार साईकुमार व धर्मा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साईकुमारने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी मी गुन्हेगार धर्माच्या संपर्कात होते. धर्माशी व्हिडीओ कॉलवर बोलताना त्याने ते स्वतः रेकॉर्ड केले आहे. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ साईकुमारला दिला. त्याने तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. मी एका मेट्रो स्टेशनची प्रभारी सुरक्षा अधिकारी असून विवाहित आहे, मला मुले आहेत.

समाजात माझी चांगली प्रतिष्ठा आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माझ्या सन्मानाला डाग लागला आहे. त्यामुळे साईकुमार व धर्मा यांच्यावर कारवाई व्हावी. तक्रारीच्या आधारे कब्बन पार्क पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मात्र अजून कुणालाही अटक झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT