Ganja Pudhari
बेळगाव

Belgaum Crime : निपाणीत कॉलेज विद्यार्थ्यांकडून गांजाची विक्री

दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : कॉलेज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निपाणी ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा २१८ ग्रॅम गांजा, ५०० रुपये, दुचाकी, मोबाईल असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी प्रतीक तानाजी शिंदे (वय २०, रा. कोगनोळी, ता.निपाणी) आणि सार्थक धनाजी गाडेकर (वय २०, रा. शिवाजीनगर, तिसरी गल्ली, कागल) यांना अटक करण्यात आली आहे. निपाणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत मत्तीवडे फाटा येथे ही करण्यात आली. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही तरुणांकडून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती हवालदार पी. ए. तळवार यांना मिळाली होती.

त्‍यानुसार सापळा रचून वरील दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी तातडीने दोघांनाही ताब्यात घेत गांजा व इतर साहित्य जप्त करून त्यांनी अटक करत अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आर. बी. बसरगी व डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह हवालदार सलिम मुल्ला, मंजुनाथ कल्याणी, परमानंद मारुशेट आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT