बेेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) होलसेल भाजी बाजारपेठेत रताळ्यांची शनिवारी (दि. 29) विक्रमी आवक झाली. तब्बल 65 हजार पिशव्यांची आवक झाल्याने दर 500 ते 800 रुपयांनी उतरला आहे. हा दर प्रति क्विंटल 7,00 ते 1,000 रुपयांवर पोहोचला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी भात मळणी लांबणीवर टाकली असून, ते रताळी काढणीत मग्न आहेत. त्यामुळे रताळ्याची आवक वाढली आहे. कोथिंबीर शंभर जुडीचा दर 300 ते 500 रुपये आहे. कांदा दर प्रति क्विंटल 1,000 ते 1,700 रूपये आहे.
बाजारात शनिवारी 70 ट्रक नव्या कांद्याची आवक झाली. किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रति किलोला 20 ते 25 रूपये आहे. बटाटा दर प्रति किलोला 25 ते 30 रूपये आहे. टोमॅटो 20 ते 40 रुपये आहे. कोंथिंबीरही एक जुडी 5 ते 10 रुपये आहे. मेथी 30 रूपये तीन जुडी, बिन्स किलोला 60 ते 70 रूपये आहे. लालभाजी, शेपू, पालक आदींचे दर स्थिर आहेत.
किराणा (प्रति किलो) : साखर : 46, साधा चहा : 320, दार्जिलिंग चहा : 440, बारीक रवा : 42, केसरी रवा : 50, मोठा रवा : 42, इडली रवा : 36, मैदा : 38, आटा : 36, बेसन : 90, मध्यम पोहे : 50, डिलक्स पोहे : 50, साबुदाणा : 80, वरी तांदूळ : 100, वाटी खोबरे : 160, हळकुंड : 180, हळदपूड : 140, मोहरी 100, वेलची : 1,900
एपीएमसी (प्रति क्विंटल)
कांदा : 1,000 ते 1,700
बटाटा : 2,000 ते 2,500
रताळी ः 700 ते 1,000
लसूण : 8,000 ते 10,000
धान्य (प्रति क्विंटल) ः भात क्र. 1 : 2,500 ते 2,600, भात क्र. 2 : 2,100 ते 2,200, बार्शी ज्वारी : 4,500 ते 4,600, विजापूर ज्वारी : 4,600 ते 5,800, हायब्रीड ज्वारी : 3,000 ते 3,200, गहू क्रं. 1 : 4,000, गहू क्रं. 2 : 3,000, शेंगदाणा : 7,700 ते 7,800
तांदूळ : तांदूळ : साधा तांदूळ क्रं. 1 : 3,000 ते 3,100, साधा तांदूळ क्रं. 2 : 2,700 ते 2,900, स्टीम हंसा : 4,000 ते 4,500, बासमती तुकडा : 3,200 ते 3,400, सावित्री गोल्ड सोनम : 4,200, सोना मसुरी क्रं. 1 : 4,200 ते 4,800, सोना मसुरी क्र. 2 : 3,400 ते 3,600, सोना मसुरी क्र. 3 : 3,300 ते 3,400, रॉ राईस : 4,200, कुमुद तांदूळ : 7,200 ते 7,700, बेळगाव बासमती क्र. 1 : 7,200 ते 8,400, बेळगाव बासमती क्र. 2 : 7,000 ते 7,200, दिल्ली बासमती क्र. 1: 11,400 ते 12,600, दिल्ली बासमती क्र. 2 : 1,300 ते 6,800.
डाळी (प्रति क्विंटल) : तूरडाळ क्र. 1 : 14,450, तूरडाळ क्र. 2 : 12,200, हरभरा डाळ : 8,400, मूगडाळ : 12,000 ते 11,000, मसूरडाळ : 7,000 ते 7,400, उडीद डाळ क्र.. 1 : 16,400, उडीद डाळ क्र. 2 : 14,000 ते 15,400, हरभरा : 7,500 ते 8,000, जवारी मसूर : 40,000, नाशिक मसूर : 15,000 ते 16,000, मूग : 9,000, मटकी : 11,500 ते 12,000.