Ended life Pudhari Photo
बेळगाव

Belgaum News : झाड अंकलेत वीट व्‍यावसायिकाने जीवन संपवले

घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : वीट व्यवसाय व घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा सहन न झाल्याने झाड अंकले (ता. खानापूर) येथील कृष्णा मारुती धबाले (४७) या वीट व्यावसायिकाने स्लॅबच्या लोखंडी बारला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२) उघडकीस आली.

कृष्णा हे वीट उत्पादन आणि गवंडी काम करत होते. त्यांनी एका फायनान्स कंपनीमधून दहा लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेतून घरात कोणी नसताना त्यांनी गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT