खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथील जनता कॉलनीतील घरात स्वयंपाक करताना सिलेंडरची गळतीने स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी घडली. यात्रेनिमित्त गल्लीत गर्दी असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी ताबडतोब पाण्याचा वापर करून लागलेली आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
रघुनाथ बसवंत मादार यांच्या घरात ही दुर्घटना घडली. या घटनेत सागर मादार (35), नागराज कोलकार (30), मसनव्वा कांबळे (55), मनीषा कांबळे (26), प्रकृत कांबळे (2), आराध्या निलजीकर (9) हे जखमी झाले आहेत. नंदगड पोलीसांना घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.