Mutage accident woman dies
बेळगाव : कुत्रा अडवा आल्याने दुचाकीला रविवारी (दि.२८) झालेल्या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच महिलेचा आज (दि.३) मृत्यू झाल्याची घटना मुतगे येथे घडली. आनंदी सचिन पाटील (वय 39, रा. पाटील गल्ली, मुतगे ) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास बेळगावला जाताना मुतगे येथे विशाल मंगल कार्यालयासमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकी पडून अपघात झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या आनंदी पाटील यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू, दीर, जाऊ असा परिवार आहे. मुतगीच येथील सामाजिक कार्यकर्ते व देवस्थान कमिटीचे सदस्य सचिन बाबुराव पाटील यांच्या त्या पत्नी होत्या.