Belgaum Municipal Corporation Pudhari
बेळगाव

Belgaum municipal corporation: सफाई कामगार भरतीसाठी अर्जांचे आवाहन

महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या पात्र सफाई कामगारांची थेट वेतनावर शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यात येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या पात्र सफाई कामगारांची थेट वेतनावर शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महापालिकेतील अधिकारी बदली योजनेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेतील सफाई कामगारांच्या रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची यादी तयार करुन थेट वेतन भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या महापालिकेत सफाई कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २१ मे ते २० जूनपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सामान्य प्रशासन विभागात सादर करावेत.

अधिक माहितीसाठी महापालिकेच्या www.belagavicity.mrc.gov.in या संकेतस्थळाला आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील सूचना फलकाला भेट द्या, असे महापालिकेने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT