आईनेच घडवून आणला मुलाचा खून 
बेळगाव

Belgaum Crime : आईनेच घडवून आणला मुलाचा खून

आईसह सात जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या व चैनीखोर बनलेल्या मुलाच्या खुनाची सुपारी आईने प्रियकराला देऊन खून घडवून आणला आहे. त्याबद्दल आईसह तिचा प्रियकर आणि त्याचे पाच मित्र अशा ७ जणांना अटक करण्यात आली. हे सहाही जण गडहिंग्लज तालुक्यातील तेरणीचे रहिवासी असून आई बंगळूरची आहे. १ नोव्हेंबरला हा खून बेळगावजवळच करून युवकाचा मृतदेह केएलईजवळ महामार्गाशेजारी झुडुपात फेकण्यात आला होता.

विजय नारायण (२४, रा. आरटीनगर बंगळूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये राकेश परशुराम जामुनी (३४, भीमनगर तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), श्रीमती मीना नारायण (४४, रा. आरटीनगर, बंगळूर), सचिन मल्लाप्पा कांबळे ३४, रा. कवळीकट्टी, रोड तेरणी), मनोज दुंपाप्पा कांबळे (रा. भीमनगर, तेरणी), तम्माण्णा रवींद्र कांबळे (२१, रा. कवळीकट्टी रोड, तेरणी), एकनाथ उमाप्पा कांबळे (३२, रा. भीमनगर, तेरणी) यांच्यासह एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.

३ नोव्हेंबर रोजी केएलई छत्रीजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. माळमारुती पोलिसांनी संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू होता. तरुणाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असताना दोन दिवसांनी मृताची आई श्रीमती मीना व तिचा प्रियकर राकेश हे दोघेजण खडेबाजार पोलिस ठाण्यात गेले. मीना यांनी आपला मुलगा २८ ऑक्टोबर रोजी बंगळूरहून बेळगावला राज्योत्सव पाहण्यासाठी आला आणि तेव्हापासून बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT