Accident file photo
बेळगाव

Belgaum Accident: दुचाकीने फरफटत नेल्याने मॉर्निंग वॉकर ठार

मुतगा येथे पहाटे अपघात; मृत भाजप युवा अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एकाला अज्ञात दुचाकीची जोरदार धडक बसत काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने मॉर्निंग वॉकर जागीच ठार झाले. महावीर बाबू गुडाज (वय ५२, रा. व्यंकटेशनगर, मुतगा) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते बेळगाव ग्रामीण भाजप युवा अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष होते. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बेळगाव-बागलकोट रस्त्यावर हा अपघात घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी महावीर व त्यांचे मित्र नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. मुतगा रोडवरील केंचवीरनगर येथे ऑफिसर्स मेस असून या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये मित्राने व त्यांनी चहा घेतला. यानंतर पुन्हा ते घराकडे निघाले होते. यावेळी लक्ष्मीनगर क्रॉसजवळून चालत निघाले होते. त्यांचा मित्र आतील बाजूस तर हे रस्त्याच्या बाजूला होते.

यावेळी मागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती संबंधित दुचाकीस्वाराने त्यांना सुमारे ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार फरारी

पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर ते फरफफटत गेले तेव्हा त्यांचा मित्रही पाठोपाठ धावला. परंतु, दुचाकीस्वार न थांबता पळून गेला आहे. पोलिसांनी हिट ॲन्ड रन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT