Child Abuse Case  Pudhari
बेळगाव

Belgaum child abuse: अंधश्रद्धेपोटी मुलगी 10 वर्षे साखळदंडात

बेळगाव जिल्ह्यातील मोळे गावातील धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

अंकली : आधुनिक युगातही अंधश्रद्धेचे सावट कायम असल्याचे धक्कादायक उदाहरण कागवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोळे गावात उघडकीस आले आहे. एका बापाने स्वतःच्या मुलीला साखळीने बांधून तब्बल 10 वर्षे घरातच कैद करून ठेवल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे.

सिद्राय असे बापाचे नाव असून तिच्यावर भानामती करण्यात आल्याचे एका भोंदूने सिद्रायला सांगितले होते. तेव्हापासून त्याने स्नेहा नामक मुलीला घरातच कैद करून ठेवले आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी स्नेहा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नियमितपणे महाविद्यालयात जात होती. त्याकाळात कोणीतरी तिच्यावर भानामती केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

त्यानंतर तिच्या वर्तनात बदल होऊन ती अचानक नाचणे, असामान्य हालचाली करणे अशा प्रकारचे वर्तन करू लागल्याचे समजते. मुलगी नियंत्रणात राहात नसल्याने तिला घरात साखळीने बांधून ठेवले असल्याचे तिचे वडील सिद्राय यांनी सांगितले. एका स्वामींनी स्नेहावर भानामती झाल्याचे सांगितले असून ती दूर करण्यासाठी मोठा खर्च येईल, असेही त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे वैद्यकीय उपचाराऐवजी तिला घरातच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT