बेळगाव : बंद घर फोडून चोरट्यांनी सोने व चांदीचे दागिने लांबवल्याची घटना शुक्रवार दि. 27 रोजी मठ गल्ली येथे उघडकीस आली. या घटनेची नोंद मार्केट पोलिस स्थानकात झाली असून पोलिस तपास करत आहेत.
मठ गल्लीतील रहिवासी प्रकाश अण्णासाहेब खोत हे पत्नीसह शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावून चन्नम्मानगर येथे बांधकाम सुरू असलेल्या घराकडे गेले होते. त्या ठिकाणाहून घरी येण्यास त्यांना उशीर झाला. याच काळात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 50 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 तोळे चांदी चोरट्यांनी लांबविली आहे.
प्रकाश खोत सायंकाळी 7 वाजता घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या नजरेला आली. त्यांनी तातडीने मार्केट पोलिसांना याची माहिती दिली. मार्केट स्थानकाचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक हुसेन केरूर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसानी चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. या घटनेत जवळपास 7 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.