Pudhari
बेळगाव

Belgaum train accident: धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

देसूर आणि खानापूर रेल्वे स्थानकां दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून 35 ते 40 वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव: देसूर आणि खानापूर रेल्वे स्थानकां दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून 35 ते 40 वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा शुक्रवारी (दि. 24) मृत्यू झाला. या घटनेची नोंद बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात झाली आहे.

मृताची उंची 5 फूट 6 इंच, रंग सावळा, शरीराने सडपातळ, चेहरा लांब, डाव्या हातावर इंग्रजीमध्ये अजय आणि उजव्या हातावर गुजरातीमध्येही काही शब्द लिहिलेले आहेत. त्याने अंगामध्ये लाल रंगाचा फुल शर्ट, निळी जीन्स घातली आहे.

याबाबत अधिक माहिती हवी असल्यास बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्याशी 0831-2405273 पीएसआय मोबाईल क्र. 9480802127 यावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT