बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. २३) सुनावणी होणार आहे. पण, दाव्याचा क्रमांक १०५ वा असल्यामुळे सुनावणी होईल की नाही, याबाबत उत्सुकता आहे. या महिन्यात चौथ्यांदा हा दावा पटलावर आला आहे.
मुंबईत सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दावा मेन्शन केला होता. त्यानुसार या महिन्यात ९, १६ आणि १७ रोजी सुनावणीसाठी दावा होता. पण, तो सुनावणीला आला नाही. आता बुधवारी दावा सुनावणीसाठी आहे. त्यादिवशी सुनावणी झाली नाही तर पुढील दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी विधिज्ज्ञ गोपाळ सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. गेल्या आठवड्यात सुनावणीसाठी ते न्यायालयात हजर होते. आता बुधवारी तरी सुनावणी होते का, याकडे सीमावासीयांचे लक्ष लागून आहे.