बेळगाव

Belgaum News: न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांचा एल्गार

न्यायालयासमोर आंदोलन; ज्येष्ठ वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप, बदलीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : न्यायालयीन कामकाजावेळी वकिलांशी अवमानकारक वर्तन केल्याचा आरोप करत बेळगाव बार असोसिएशनने गुरुवारी (दि. २०) दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले. संबंधित न्यायाधीशांची बदली होईपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा इशारा वकिलांनी दिल्याने न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठ तसेच कनिष्ठ वकिलांना वेळोवेळी अवमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आंदोलक वकिलांनी केला. तसेच खटल्यांच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेत अनावश्यक हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रारही वकिलांनी केली. बुधवारी (दि. १९) सुनावणीदरम्यान वकिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर पोलिस उपनिरीक्षकांना बसण्यास सांगण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला.

एका ज्येष्ठ वकिलांनी न्यायालयासमोरील जागा वकिलांसाठी असते. इतरांनी बाजूच्या जागेत बसावे, असे निदर्शनास आणून दिले. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. त्यावर संबंधित आदेश दाखविण्याची मागणी केली. त्यानंतर वकिलांनी संबंधित आदेश सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा वकिलांचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT