बेळगाव : खासबाग येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी श्रीमती सीमा उत्तम वंजारे (वय ४३, रा. पाटील गल्ली, खासबाग) यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री ते सोमवारी दुपारच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असून सोमवारी रात्री याची पोलिसांनी नोंद करून घेतली.
श्रीमती सीमा या रविवारी रात्री साडेदहा वाजता घर बंद करून गेल्या होत्या. या काळात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरात असलेल्या तिजोरीचे कुलूप तोडून आतील ३० ग्रॅम सोन्याचे दागिने २०० ग्रॅम चांदीच्या वस्तू व १ लाखाची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
चोरीचा आकडा पाच लाखांवर असून पोलिसांनी मात्र ३ लाख ७४ हजार ५०० रूपयांची नोंद करून घेतली आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करीत आहेत.