Karnataka Electricity pudhari photo
बेळगाव

Karnataka Electricity: बेळगावसह खानापुरात उद्यापासून वीज नाही

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गणेशोत्सव काळात सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी हेस्कॉमने वीज उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती व देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये शनिवारी (दि. ५) आणि रविवारी (दि. ६) सकाळी ९ ते ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

शनिवारी बेळगाव तालुक्यातील रंगदोळी, तुम्मरगुद्दी, सोमनट्टी, कबलापूर, चंदूर, खणगाव केएच, खणगाव बीके, अष्टे, मुचंडी आणि कलखांब परिसरातील वीजपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. रविवारी बेळगाव तालुक्यातील मच्छे, दत्तनगर, नावगेकरनगर, गोडसे कॉलनी, ओंकारनगर, झाडशहापूर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडे, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, पिरनवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडे, हंचेनहट्टी, अशोक आयर्न परिसर, मच्छे औद्योगिक परिसर, सुवर्णसौध परिसर, कोंडुसकोप्प, हलगा, बस्तवाड, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, साईनगर, भरतेश कॉलेज परिसर, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कामकरहट्टी आणि बडेकोळमठ आदी भागांत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

खानापूर तालुक्यातकोडचवाड वीजपुरवठा केंद्रांतर्गत पारीश्वाड, हिरेमुन्नोळी, जकनूर, चिक्कहट्टीहोळी, हिरेहट्टीहोळी, चिक्कदिनकोप्प, कग्गनगी, आवरोळी, लोकोळी, दोड्डहोसूर, गणेबैल, देवलत्ती, कामशिनकोप्प, जैनकोप्प, कोडचवाड, कारलगा, हब्बनहट्टी, कौंदल, झाडनवगा, कोकण नावगा, करंबळ, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, शिरोळी, चापगाव, लैला साखर कारखाना परिसर, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बरगाव, निडगल, सन्नहोसूर, जळगा, लक्केबैल, यडोगा, बलोगा, गांधीनगर, हलकर्णी, औद्योगिक वसाहत, बाचोळी, लोंढा, नागरगाळी, कुंभार्डा, माडीगुंजी रेल्वे स्टेशन, माडीगुंजी, मोहिशेत, भालके बीके, भालके केएच, शिंदोळी, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, डोकेगाळी, खानापूर शहर, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोळी, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, या गावांतही रविवारी दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT