KSRTC Bus 
बेळगाव

Karnataka KSRTC : खानापूर ११, कोल्हापूर २४ रुपयांनी बसप्रवास महाग

मासिक बसपासच्या दरातही वाढ : सुधारित तिकीट दर लागू

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात वाढ केली असून नवीन सुधारित प्रवास दर ५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे. बस प्रवास भाड्यात सरासरी २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सामान्य बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त ९ रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.

जलदगती बसमधील प्रवासासाठी १० टप्प्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली असून किमान १९ रुपयांपासून कमाल ६८ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वातानुकूलित ऐरावत, ड्रीम क्लास व अंबारी बस सेवांच्या भाड्यात ६ किमी प्रवासासाठी ५ रुपये, ६ ते १८ किमी प्रवासासाठी १० रुपये तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कमाल १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बीएमटीसीच्या बस प्रवास भाड्यात किमान ३३ टक्क्यांपासून कमाल ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

बसपास दरात २३ टक्‍के वाढ

बस भाड्यात वाढ झाल्याने मासिक बस पासच्या दरातही वाढ झाली आहे. केएसआरटीसीमध्ये २३ टक्के व बीएमटीसीमध्ये २५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. केएसआरटीसीच्या ग्रामीण मार्गांवरील एक्सप्रेस व नॉन-स्टॉप बसमधील सामान्य प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्याचे भाडे ५२० वरून ६४० झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते ४६५ वरून ५७० झाले आहे. नियमित बसमध्ये, सामान्य प्रवाशांसाठी ते ४६० वरून ५७० झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ४१५ वरून ५१० झाले आहे.

एक्सप्रेस व नॉन-स्टॉप बसमधील नियमित प्रवाशांसाठी कमाल भाडे ३ हजार २२० वरून ३ हजार ९६० पर्यंत वाढवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते २ हजार ९०० वरून ३ हजार ५७० पर्यंत वाढवण्यात आले आहे. बसमध्ये नियमित प्रवाशांसाठी पासची किंमत २ हजार ७० वरून २ हजार ५५० पर्यंत व ज्येष्ठ नागरिकांसाठी १ हजार ८६५ वरून २ हजार २९० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मासिक बस पास एक्सप्रेस/नॉन-स्टॉप बसच्या एकूण २० महिन्यांची व सामान्य वाहतुकीच्या एकूण १० महिन्यासाठी दिला जातो. तर बीएमटीसी बसच्या नियमित दैनिक पास, वोल्‍व्‍हो दैनिक पास, नियमित मासिक पास, वज्र वोल्वो मासिक पासच्या दरात २५ टक्के व साप्ताहिक पासच्या दरात २० टक्के वाढ करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT