जवान जगदीश शिंदे Pudhari
बेळगाव

Belgaum Soldier Death | हरियाणा येथे कंग्राळीच्या जवानाचा वाहन अपघातात मृत्यू

कंग्राळी (खु.) येथील जवान जगदीश शिंदे यांचे अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना झालेल्या वाहन अपघातात मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

Kangrali jawan accident in Ambala

कंग्राळी : कंग्राळी (खु.) येथील जवान जगदीश शिंदे यांचे अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना झालेल्या वाहन अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि.2) घडली. जवान जगदीश शिंदे यांचा मृतदेह बुधवारी (दि. 4) कंग्राळीला आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. ते एक कर्तव्यदक्ष, देशाभिमानी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT