Belgaum Traffic Diversion 
बेळगाव

Belgaum Traffic Diversion: विसर्जन मार्ग आज रहदारीसाठी बंद

रहदारी पर्यायी मार्गाने वळवणार : पोलिस आयुक्तालयाकडून यादी, पार्किंगस्थळे जाहीर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरात शुक्रवारी (दि. २५) निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी विसर्जन मिरवणूक मार्गासह अन्य काही प्रमुख मार्गावरील रहदारी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गांची यादी तसेच वाहन पार्किंगची यादी पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिली आहे.

विसर्जन मिरवणुकीला नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ होणार आहे. या काळात सार्वजनिक मंडळाच्या श्रीमूर्ती चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, कॉलेज रोड, पिंपळ कट्टासह अनेक मार्गाने नरगुंदकर भावे चौकाकडे येणार आहेत. ही मिरवणूक येथून सुरु होऊन मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, रेणुका हॉटेल क्रॉस व तेथून कपिलेश्वर तलावात विसर्जन होणार आहे.

मिरवणूक संपेपर्यंत बदललेला वाहतूक मार्ग

किल्ला तलाव, अशोक पिलर, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोडने खानापूरकडे जाणारी वाहने आरटीओ सर्कलपासून कोल्हापूर सर्कल, वाय जंक्शन, सदाशिवनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, बाची क्रॉसपासून आरगन तलाव गांधी सर्कल ते शौर्य चौक, केव्ही-२, शरकत पार्क, सीईओ बंगला, सेंट पॉल्स हायस्कूल, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस, ग्लोब थिएटरपासून खानापूर रोडला सोडली जाणार आहेत.

खानापूर व गोगटे सर्कलकडून रेल्वे उड्डाणपुलावरुन बेळगावात येणारी वाहने गोगटे सर्कलपासून काँग्रेस रोड ते तेथून पुढे कॅंमधून अरगन तलाव, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर ते बॉक्साईट रोडमार्गे सोडली जाणार आहेत.

गोगटे सर्कलहून रेल्वे स्टेशन व हेड पोस्ट ऑफिसकडून शनी मंदिरकडून जुना पीबी रोडकडे जाणारी वाहने गोवावेस, नाथ पै सर्कल, खासबाग, बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्लीमार्गे पुढे सोडली जाणार आहेत.

नाथ पै सर्कलकडून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाण पूलमार्गे जाणारी वाहने खासबाग, बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्लीमार्गे सोडली जाणार आहेत.

जिजामाता सर्कलकडून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोड, कपिलेश्वर पुलावरुन जाणारी वाहने जिजामाता सर्कलपासून थेट सीबीटी, पॅटसन शोरुम, जुना पीबी रोडमार्गे सोडली जातील.

जुना पीबी रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे सर्कलकडून कपिलेश्वर पुलाकडे जाणारी वाहने संभाजी गल्ली रस्तामार्गे बसवेश्वर सर्कल खासबाग व नाथ पै सर्कलकडे सोडली जातील.

जुना पीबी रोड, यश हॉस्पीटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिरकडे जाणारी वाहने यश हॉस्पीटलजवळून व्हीआरएल लॉजिस्टिकपासून जुन्या पीबी रोडमार्गे सोडली जातील.

गुड्‌स शे़ड रोडमार्गे कपिलेश्वर पूल रोडकडे जाणारी वाहने एसपीएम रोडकडून मराठा मंदिर, गोवावेस सर्कलकडे सोडली जाणार आहेत.

ज्या मार्गावरुन मिरवणूक निघणार आहे त्या मार्गासह काकतीवेस रोड, गणपत गल्लीतून अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. ही बंदी शुक्रवारी दुपारी दोनपासून दुसऱ्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत असेल.

गणेश भक्तांसाठी पार्किंगची सोय

देशपांडे खूटपासून गांधीनगर सर्कलकडून वेंगुर्ला रोडमार्गे येणाऱ्यांसाठी सेंट झेवियर्स हायस्कूल परिसर.

महिला पोलिस ठाण्याजवळील खुली जागा.

सरदार्स मैदान, न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर.

भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅण्टोन्मेंटची खुली जागा.

संभाजी उद्यान, जुने भाजी मार्के, मुजावर खूट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT