Moneylending Pudhari News Network
बेळगाव

Belgaum Moneylending: बेकायदा सावकारी, आली उरी!

पिता-पुत्राला अटक; सहा लाखांची रोकड, कोरे धनादेश, बाँड जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गरजूंना कोंडीत पकडून जादा व्याजदराने कर्ज देणाऱ्या सावकार बाप-लेकाला गोकाक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोरे धनादेश, बाँड, प्रॉमिसरी नोट तसेच व्याजाने रक्कम दिल्याची अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

यल्लाप्पा उद्दाप्पा बिराजगोळ आणि त्याचा मुलगा विठ्ठल यल्लाप्पा बिराजगोळ (दोघेही रा. विवेकानंदनगर दहावा क्रॉस, गोकाक) अशी त्यांची नावे आहेत. उपरोक्त दोघे संशयित अनेकांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत जादा व्याजदराने रक्कम देत असल्याची तक्रार पोलिस खात्याकडे दाखल झाली होती.

गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गोकाक शहरचे पोलिस निरीक्षक किरण एस. मोहिते यांनी न्यायालयाकडून या दोघांच्या घराचा झडती वॉरंट मिळवून तपास केला. यामध्ये हे दोघेजण बेकायदेशीर सावकारी करत असल्याचा पुरावा दर्शविणारी अनेक कागदपत्रे मिळाली. त्याच्या आधारे दोघांवर सावकारी कायदा-२००४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक मोहिते यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस मुख्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT