Crime News Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Crime: बेकायदेशीर सावकारी, दोन भावांवर पोलिस भारी!

दोन भाऊ अटकेत, एक फरार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून कर्जदारांकडून अवाजवी व्याजाची वसुली करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन भावांना रायबाग पोलिसांनी रविवारा अटक केली. या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आदित्य अशोक भोसले आणि अभिषेक अशोक भोसले अशी अटक झालेल्या भावांची नावे आहेत. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी या दोन भावांकडून सुमारे ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात आतापर्यंत जवळपास १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही पैशांची मागणी केली जात होती. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार माने यांनी दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT