बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून संदीप पाटील यांनी गुरुवारी (दि. २८) कार्यभार स्वीकारला. मावळते आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला.
पंधरा दिवसांपूर्वी पाटील यांच्यासह अन्य तिघा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निघाला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे तो आदेश थांबला होता. बुधवारी (दि. २७) नवीन बदलीचा आदेश बजावला. यामध्ये पाटील यांनी केएसआरपी डीआयजीपीचा कार्यभार सी. के. बाबा याच्याकडे सोपवून उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी म्हणून कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे.
त्यानुसार पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी कार्यभार स्वीकारला. डॉ. राठोड हे आता सीआयडीचे आयजीपी म्हणून आता कार्यभार स्वीकारणार आहेत. यावेळी बेळगावचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.