Leopard Sighting Pudahri
बेळगाव

Belgaum Leopard Sighting: बेळगाव-हुक्केरी सीमेवर बिबट्याचा मुक्काम

रात्री दर्शन; शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

दड्‍डी : पंधरा दिवसांपूर्वी मरणहोळ परिसरात आढळलेल्या बिबट्याने बेळगाव-हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरच मुक्काम ठोकल्याचे दिसत असून, मंगळवारी रात्रीही या बिबट्याचे दर्शन झाले.

मरणहोळ (ता. बेळगाव) आणि शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) या सीमेशी तेऊरवाडी (ता. चंदगड), लमाणवाडा (ता. गडहिंग्लज ) या गावांच्या सीमाही संलग्न असून, याच परिसरातील जंगली भागात बिबट्याचा मुक्काम दिसतो.परिसरातील शेतकऱ्यांना व रात्री दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. मंगळवारी रात्री १० वाजता या बिबट्याच्या हडलगे-नेसरी या मार्गावर दर्शन झाले. महावितरणचे कर्मचारी राजकुमार पाटील व वैजनाथ पाटील हे दोघे दुचाकीवरून नेसरीहून कोवाडला जात असताना त्यांना बिबट्या दिसला.

पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या हडलगे नव्या पुलाजवळून लमानवाडा, शट्टीहळी जंगलाच्या दिशेने गेला. यामुळे हुक्केरी, बेळगाव, चंदगड व गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवरील शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. हडलगे गावच्या शिवाराला लागून चिंचणे - कामेवाडी जंगल व पुढे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी जंगल आहे. या ठिकाणी या बिबट्याचा वावर मागील पंधरवड्यापासून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT