बेळगाव : वैभवनगर येथे बंद घर फोडून १ लाख १४ हजारचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. गुरूवारी उघडकीस आलेल्या या घटनेची एपीएमसी पोलिसांत नोंद झाली आहे.
वैभवनगर दुसरा क्रॉस येथील साहील रसूल नायकवडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मदनी कॉलनी दुसरा क्रॉस वैभवनगर येथे ते कुटुंबासह भाडोत्री घरात राहता. नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी ते घराला कुलूप लावून गेले होते.
यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील स्वयंपाक घरात ठेवलेली तिजोरी फोडून चोरट्यांनी १७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १२ हजाराची ५० ग्रॅम चांदी चोरून नेली.