बेळगाव

Belgaum Farmers Protest : महामार्गावर चक्‍काजाम

रहदारी काहीकाळ रोखली : कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो ऊस उत्पादक कोगनोळीसह हत्तरगी टोलनाका येथे रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव / कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ तसेच हत्तरगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८ पासून डीएसपी गोपाळ गौडर यांच्या नेतृत्वाखाली ३ सीपीआय, ८ उपनिरीक्षक, २० एएसआय आणि सुमारे २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच संपूर्ण परिसरावर तात्पुरत्या सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. आंदोलनस्थळाचा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला असून, आंदोलनस्थळी कोणत्याही मोठ्या नेत्याने भेट दिली नसल्याने आंदोलन अद्याप सुरूच आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलनस्थळी आगमन होताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती.

शेतकऱ्याने कमानीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ

आज सकाळपासून कर्नाटक सीमाभागात शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोलनाक्याच्या कमानीवर एका शेतकऱ्याने चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यावेळी अन्य शेतकरी आंदोलनकर्त्यांनी व पोलिसांनी त्याला विनंती करत पकडून त्याचा जीव वाचविण्यात आला. सकाळपासून हजारो शेतकरी या ठिकाणी आंदोलन करीत असताना अचानक सायंकाळी हा शेतकरी कमानीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT