कारवार : हल्याळमधील (जि. कारवार) एपीएमसीच्या मैदानात रविवारी (दि. 18) जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात लहानमोठ्या 100 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वि. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात होणार असून विजेत्याला चारचाकी वाहनाचे बक्षीस आहे.
द्वितीय कुस्ती महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड वि. इराण चॅम्पियन मिर्जा इराणी यांच्यात होणार असून विजेत्याला ट्रॅक्टर बक्षिस आहे. तृतीय कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन माऊली कोकाटे वि. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात, चौथी कुस्ती महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर वि. इराण चॅम्पियन इरफान इराण, पाचवी हरियाणाचा जॉईंट गुज्जर व महाराष्ट्र केसरी दादा शेळके, सहावी विकास धोत्रे व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे, सातवी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व हरियाणा चॅम्पियन बंटी हरियाणा, आठवी महाराष्ट्र चॅम्पियन भारत मदने वि. महाराष्ट्र चॅम्पियन माऊली जमदाडे, नववी महाराष्ट्र चॅम्पियन रवी चव्हाण वि. भोला हरियाणा, दहावी महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण वि. सतपाल सोनटक्के महाराष्ट्र यांच्यात होणार आहे. नेपाळचा देवा थापा वि. हरिद्वारचा अमित लंका यांच्यात मनोरंजनाची कुस्ती होणार आहे. प्रथम क्रमांकाची महिला कुस्ती महाराष्ट्र केसरी सोनाली मंडलिक वि. सुमीत शेरावत (हरियाणा) यांच्यात, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती वेता अण्णीगेरी वि. गायत्री सुतार यांच्यात होणार आहे.