Jewellery Theft (Pudhari Photo)
बेळगाव

Belgaum gold theft: घरातील अर्धा किलो सोन्याची चोरी

व्यावसायिकाची फिर्याद : दोन वर्षांत चोरीला गेल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : घरात ठेवलेले सुमारे अर्धा किलो सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद पट्टणशेट्टी नामक उद्योजकाने तीन दिवसांपूर्वी कॅम्प पोलिसांत दिली आहे. हे दागिने नेमके कधी गेले याची माहिती नसून गेल्या दोन वर्षात हा प्रकार घडल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, घरातील कपाटात वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे अर्धा किलोहून अधिक दागिने ठेवले होते. टप्प्याटप्प्याने यातील दागिने चोरीला गेले आहेत. परंतु, ते नेमके कोणी नेले हे घरच्यांनाही माहिती नाही. काम करणारे अथवा बाहेरून कोणी नेले का? हेदेखील कुटुंबियांना माहिती नाही. त्यामुळे, त्यांनी तीन दिवसांपूर्वी कॅम्प पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी याची नोंद करुन घेतली असून निरीक्षक आनंद वणकुद्रे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT