बेळगाव : कौटुंबिक वादातून नातवानेच आजीवर धारदार चाकूने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१६) रात्री अगसगे (ता.. बेळगाव)) येथे घडली.... या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संशयित फरार झाला आहे. याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बाळव्वा कलगौडा पाटील (वय ७०,, रा... अगसगे) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव तर कलगौडा अप्पय्यागौडा पाटील (२४) असे संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कौटुंबिक कारणातून आजी आणि नातवामध्ये जोरदार वाद झाला.... काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन संतापाच्या भरात कलगौडाने घरातील धारदार चाकू घेऊन बाळव्वा यांच्यावर सपासप वार केले... या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळव्वा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले...
घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.. या घटनेनंतर खळबळ माजली असून संताप व्यक्त केला जात आहे.. घटनास्थळी पोलिस उपायुक्त नारायण बरमणी,, एसीपी गंगाधर तसेच पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी पाहणी केली. संशयित कलगौडा शनिवारी रात्रीपासून फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.
पोलिसांनी समज देऊनही...
बाळव्वा पाटील गेल्या काही दिवसांपासून नातू कलगौडा याच्या दहशतीमुळे भयभीत झाल्या होत्या. तो वारंवार त्यांच्याशी वाद घालत असल्याने त्यांनी ११२ सहाय्यवाणीवर संपर्क साधून मदतीची याचना केली होती. तसेच येथेही तक्रार नोंदविली होती. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी घरी जाऊन कलगौडाला समज दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून काही वेळातच त्याने आजीवरच धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले.