अन्‍नपूर्णा सिद्धाप्पा बडचण्णावर, दिलीप गडकरी 
बेळगाव

Belgaum Crime: प्रेयसीची हत्या; मृतदेह उसाच्या शेतात

प्रियकराला अटक; महिनाभरापासून बेपत्ता प्रकरणाला वळण

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला असून, पोलिसांनी खूनप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याची कबुली संशयिताने दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अन्‍नपूर्णा सिद्धाप्पा बडचण्णावर (३४, रा. तिगडी, सध्या रा. कौजलगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दिलीप गडकरी (३७ रा. सिमलापूर, ता. गोकाक) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. खुनाची घटना मुडलगी तालुक्यातील कौजलगी येथे घडली आहे. कुलगोड पोलिस तपास करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्‍नपूर्णा ही शेतमजूर म्हणून काम करत होती. महिनाभरापूर्वी ती अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी कुलगोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, सुरुवातीला काहीच धागेदोरे सापडले नव्हते; मात्र तिच्या फोनच्या नोंदी तपासल्यानंतर दिलीपशी तिचे वारंवार बोलणे आणि मेसेज देवाणघेवाणीचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी दिलीपचा शोध सुरू केला होता.

मात्र पोलिस तपासाची कुणकुण लागताच दिलीप फरार झाला. अखेर पोलिसांनी मोबाईल स्थळनिश्र्चितीच्या आधारे दिलीपला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अन्‍नपूर्णाची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उसाच्या शेतात शोधमोहीम राबविली असता अन्‍नपूर्णाचा कुजलेला मृतदेह व चपला सापडल्या.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. तसेच दिलीपने अन्‍नपूर्णाच्या अंगावरील दागिने काढून आपल्या दुचाकीच्या पेटीत ठेवले होते. ते दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT