बेळगाव

Belgaum: वीज धक्‍क्‍याने छतावरून पडल्याने मुलगी ठार

इंगळी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

अंकली : विजेचा धक्का लागून घराच्या छतावरून पडल्याने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री इंगळी गावात घडली. सानवी कांबळे असे त्‍या मुलीचे नाव आहे.

सानवी येथील सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी घरी खेळत असताना दोरी उडीची दोरी घरावरील विजेच्या तारेवर पडली. ती दोरी काढण्यासाठी सानवी वरच्या मजल्यावर गेली असता तिला विजेचा धक्का बसला. त्यानंतर ती घराच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाली.

तिला तातडीने उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी तिचा मृत्‍यू झाला. घटनेची नोंद अंकली पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT