Ganja Pudhari
बेळगाव

Belgaum Crime: गांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक

सीसीबी पथकाने तारिहाळ-हलगा रस्त्यावर छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सीसीबी पथकाने तारिहाळ-हलगा रस्त्यावर छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दि.१९ मे रोजी करण्‍यात आली.

ओंकार यल्लाप्पा कोळेकर (वय २२, रा. शिवाजी गल्ली, तारिहाळ), नागेंद्र शिवाजी रागीपाटील (वय २३, रा. अडविसिद्धेश्वर गल्ली, तारिहाळ), प्रमोद धर्मेंद्र कसबेकर (वय १८, रा. उचगाव, कोल्हापूर) आणि गजानन सचिन पाटील (वय १९, रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व सीसीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तारिहाळ-हलगा गावच्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला. हे सर्व संशयित गांजाची विक्री करत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून २ किलो ७७६ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल तसेच मोटारसायकल असा एकूण सुमारे २.९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT