बेळगाव

Belgaum News : अपघात भरपाई थकविल्याने पाच बस जप्त

सहा लाख जमा होताच न्यायालयाकडून सुटका

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अपघातातील जखमींना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने बैलहोंगल येथील दिवाणी न्यायालयाने केएसआरटीसीच्या पाच बस जप्त करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी पाच बस जप्त केल्याने बैलहोंगल तालुक्यात खळबळ उडाली. नुकसानभरपाईची थकबाकी सुमारे ७५ लाख रुपये असताना संबंधित रक्कम देण्यासाठी पाठपुरावा करूनही केएसआरटीसीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने न्यायालयाने जप्तीची कारवाई केली.

बैलहोंगल तालुक्यातील बुधिहाळ गावातील अपघात प्रकरणातील जखमीना नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांना मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. मात्र, आदेशानुसार नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आली नसल्याने न्यायालयाने केएसआरटीसीच्या बस जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पाच बस जप्त केल्या.

दरम्यान, केएसआरटीसीकडून सहा लाख रुपये न्यायालयात जमा करण्यात आले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने जप्त केलेल्या बस सोडण्याचा आदेश दिला. अशी माहिती फिर्यादीचे वकील डी. वाय. गरगद यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT