बेळगाव

बेळगाव : सासरवाडीत हवेत गोळीबार करत पत्नीला ठार मारण्याची धमकी; पतीला अटक

निलेश पोतदार

अंकली : पुढारी वृत्तसेवा;  माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणण्यासाठी गेलेल्या पतीने हवेत गोळीबार करून  ठार मारण्याची धमकी दिली. अथणी पोलिसांनी शिवानंद काळेबाग ( रा. सिंदगी, जि. विजापूर) याला अटक केली आहे. या प्रकरणी प्रीती काळेबाग हिने फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, अथणी येथील प्रीती हिचा ४ वर्षांपूर्वी शिवानंद काळेबाग याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पतीचे एका महिलेशी संबंध निर्माण झाले. याला कंटाळून प्रीती अथणीतील माहेरच्या घरी येऊन राहिली. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगाही आहे.

सोमवारी ( दि.१२ ) पती शिवानंदने प्रीतीच्या अथणी येथील माहेरच्या घरी आला.  तिला आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. तिने नकार दिला. शिवानंदने आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर दाखवून आपल्या घरी येण्याची धमकी दिली. रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन गोळ्या झाडल्या. तू सोबत आली नाहीस तर रिव्हॉल्व्हरमधल्या उरलेल्या गोळ्या तुला घालीन आणि मीसुद्धा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने पत्‍नीला दिली. अथणी पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त करून शिवानंद काळेबाग ( रा. सिंदगी, जि. विजापूर) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT