Cyber Crime Pudhari
बेळगाव

Belgaum Cyber Crime : सायबर भामट्यांकडून शेतकरीही लक्ष्य

सोलार पंप आमिषाने फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी कोणत्याही घटकाला सोडलेले नसून शेतकऱ्यांनाही लक्ष्य केले आहे. पीएम कुसूम योजनेंतर्गत सोलार पंपसेट देण्याच्या आमिषाने एका शेतकऱ्याची १ लाख १३ हजाराची फसवणूक केली आहे. हा वृद्ध शेतकरी कित्तूर तालुक्यातील उगरखोडमधील असून त्यांनी जिल्हा सीईएनकडे फिर्याद दिली आहे.

शिवाजी नामक ६३ वर्षीय शेतकऱ्याला ऑगस्ट २०२६ मध्ये फेसबुकवर एक लिंक आली. पीएम कुसूम-बी योजनेंतर्गत सोलार पंप देणे सुरु असून तुम्ही १० टक्के रक्कम भरल्यास ९० टक्के सवलतीत हा पंप मिळणार असल्याचे सांगितले आहे. याला भुलून सदर शेतकऱ्याने या लिंकवरील अर्ज भरला. आधी अर्जासाठी ८ हजार व त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळी कारणे सांगत १ लाख १३ हजार रूपये काढून घेतले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर सदर शेतकऱ्याने याबाबत जिल्हा सीईएनमध्ये फिर्याद दिली आहे.

गोकाक तालुक्यातील कोण्णूरमधील एका तरुणाची जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याची नोंदही जिल्हा सीईएनमध्ये झाली आहे. या तरुणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत वेळोवेळी रक्कम काढून घेतली. ही रक्कम तब्बल १० लाखाहून अधिक असून परतावा काहीही मिळाला नाही. त्यामुळे फसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT