विजापूर : उसाला लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा भाजून मृत्यू झाला. जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बनहट्टी पी. ए. गावात ही घटना घडली आहे. मल्लनगौड बिरादार ऊर्फ मेलिनमणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मल्लनगौड बिरादार यांच्या शेतातील उसाला अचानक आग लागली. संपूर्ण ऊस पिकाला आगीने वेढले होते. मल्लनगौड आग विझवण्यासाठी शेतात गेले असता आगीमध्ये भाजून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवऱहिप्परगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.