Ganja Pudhari
बेळगाव

Belgaum engineering students ganja supply: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून गांजाचा पुरवठा

नाशिकहून आवक : तिघांना अटक, 30 हजारांचा एक किलो गांजा जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण इतके वाढत आहे की नशा करता करता हेच तरुण आता अमली पदार्थांची विक्रीही करत आहेत. मार्केट पोलिसांनी गांजाप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यामधील एक अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिकणारा तरुण आहे. तो नाशिकमधून गांजा आणून बेळगावात पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गांजा विकणाऱ्या त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यात राजू गंगाधर नायक (वय 29, मूळ रा. दुर्गानगर, खानापूर, सध्या रामतिर्थनगर, बेळगाव), पृथ्वीराज आनंद कदम (वय 24, रा. लक्ष्मी मंदिरजवळ गुडगनट्टी रोड दादबानट्टी, यमकनमर्डी, ता. हुक्केरी) व प्रेमनाथ ऊर्फ सूरज व्ही. कुंडेकर (वय 22, रा. महाद्वार रोड, तिसरा क्रॉस) या संशयितांचा समावेश आहे.

उपरोक्त तिघे संशयित गांजा विक्री करत असल्याची माहिती मार्केटचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता उपरोक्त तिघेजण सापडले. या तिघांकडे 1 किलो 190 ग्रॅम गांजा सापडला. याची किंमत 29,500 रुपये होते. पोलिसांनी तो जप्त करुन तिघांवर गुन्हा दाखल केला.

यातील पृथ्वीराज हा हुक्केरी तालुक्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहितीही पोलिस सूत्रांनी दिली. तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून गांजा आणून इथे विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT