निपाणी : देवदर्शन आटोपून गावी परतणाऱ्या ६० वर्षीय वृद्धेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने तिच्या गळ्यातील १.५० लाख रुपये किमतीचे एक तोळा सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सौंदलगा-भिवशी रोडवर घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शामराव म्हाळुंगे (वय ६०, रा. भिवशी, ता. निपाणी) या सौंदलगा येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन आटोपल्यानंतर त्या मुलीसह आणि शेजारील महिलेसमवेत पायी भिवशीकडे परतत होत्या. यावेळी भिवशी फाटा परिसरात एक भामटा दुचाकी घेऊन त्यांच्याजवळ आला. त्याने वृद्धेला गावाकडे जाण्यासाठी लिफ्ट दिली.
काही अंतर पुढे गेल्यावर दुचाकी बंद पडल्याचा बनाव करत त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करीत पोबारा केला. यावेळी त्या वृद्धेने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता.