Cyber Fraud Pudhari
बेळगाव

Belgaum Cyber Fraud: एपीके फाईल्सवर क्लिक, २१ लाख गायब

सदाशिवनगरच्या वृद्धाची तीन एपीके फाईल्स्‌द्वारे फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मोबाईलमधील आधीचे सीमकार्ड खराब झाल्याने वृद्धाने नवीन सीम घातले. ते घालून आलेल्या तीन एपीएके फाईल्सवर क्लीक करताच तिन्ही बँक खात्यामधील मिळून तब्बल २१ लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन भामट्यांनी वर्ग करून घेतली. सदर वृद्ध सदाशिवनगरमधील असल्याने या प्रकरणाची शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी २५ जून रोजी ८१ वर्षीय ईश्वराप्पा नामक वृद्धाचे सीमकार्ड खराब झाले होते. त्याने एअरटेल कंपनीत जाऊन सीम बदलून घेतले. यानंतर आपला मोबाईल सुरू केला. यावेळी त्यांच्या मोबाईलवर युनियन बँक अपडेट, पीएम किसान योजना व मेंबर ॲप अशा आशयाच्या तीन एपीके फाईल्स आल्या होत्या. त्यावर त्यांनी क्लीक करताच त्यांच्या तिन्ही बँक खात्यातून तब्बल २० लाख ८८ हजार १६७ रुपये वर्ग झाले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतेच शहर सीईएन पोलीस ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दिली. या प्रकरणाची नोंद करुन घेत पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी तपास सुरू केला आहे.

सीबीआयची नोटीस ओळखणार 'अभय'

सीबीआयची नोटीस पाठवल्याचे भासवून तसेच डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण तथा सीबीआयने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली सुरू केली आहे. याला एआय बेस्ड हेल्पबोट फॉर ऑन्थेटिकेशन ऑफ सीबीआय नोटीस (अभय) असे नाव दिले आहे. सीबीआयने एखाद्या व्यक्तीला अथवा विभागाला नोटीस जारी केली असेल तर ती खरी की बनावट हे या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे तपासले जाणार आहे. कारण, जी नोटीस खरी असते त्यावर क्यूआर कोड असतो. त्याची सत्यता तपासल्यास नोटीस बनावट की खरी हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सीबीआयची नोटीस आली म्हणून घाबरून न जाता तुमच्या मोबाईलवर ओटीपीद्वारे सत्यता पडताळून पाहावी, यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT