Ended life Pudhari Photo
बेळगाव

Belgaum News : अजून मृत्यू का येत नाही म्हणत वृद्धाने जीवन संपवले

वडगावमधील घटना : मृत्यूनंतर सोपस्कारासंबंधी लिहिली चिठ्ठी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पत्नीच्या मृत्यूनंतर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ बनलेले वृद्ध आपल्याला अजून मृत्यू का येत नाही, असे सतत म्हणत असत. यानंतर मंगळवारी रात्री परसात असलेल्या विहिरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले. रामचंद्र कृष्ण बडवे (वय ८६, रा. चावडी गल्ली, वडगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीच्या निधनानंतर रामचंद्र मानसिकदृष्ट्या अस्वस्थ बनले होते. लहानसहान बाबींवरुन चिडणे, भांडण काढणे, एकांतात जाऊन बसणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरु होते. माझी पत्नी गेली मला का मरण येत नाही, असे ते सातत्याने म्हणायचे. यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेऊन मंगळवारी रात्री साडेबारा ते सकाळी सातच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी मराठीत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. माझा मृत्यू झाला की स्मशानात नेऊन आवश्यक ते सोपस्कार करा, पूजा करा नैवेद्य दाखवा, असे त्यात लिहून ठेवलेले आहे. त्यांनी अशा प्रकारे चिठ्ठी लिहून जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मुलगा राजेश रामचंद्र बडवे (वय ६१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याची शहापूर पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.

वडगाव परिसरातील विहिरीत मृत्यूची बातमी समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अवधूनत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली व शुभम हुली सर्व लवाजम्यासह घटनास्थळी पोचले. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी व शहापूर ठाण्याचे पोलिसही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT