बेळगाव

Belgaum Bike Theft: अडीच लाखांच्या आठ दुचाकी जप्त

अनगोळच्या चोरट्याला अटक : उद्यमबाग पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सात मोटरसायकलींसह एक मोपेड अशा आठ दुचाकी जप्त करुन त्या चोरणाऱ्या संशयिताला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या या सर्व दुचाकींची किंमत सुमारे २ लाख ६५ हजार रुपये होते.

रियान इम्तियाज शेख ऊर्फ रमेश अर्जुन शिंदे (वय ३३, चौथा क्रॉस, झटपट कॉलनी अनगोळ) असे संशयिताचे नाव आहे. तो मुस्लीम समाजाचा तरुण असून त्याने दोन नावे धारण केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, उद्यमबागचे निरीक्षक महांतेश होसपेटी व त्यांचे सहकारी गस्तीवर असताना संशयावरुन उपरोक्त तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केली असता त्याने शहर परिसरातून दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT