बेळगाव : पावसाअभावी संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून किमान नैतिकतेला मूठमाती देत राज्योत्सवाची तयारी जोमात सुरु केली आहे. त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळामुळे जिल्ह्यातील सर्व पिके जवळपास वाया गेली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, अशा संवेदनशील वातावरण जिल्हा प्रशासनाकडून मात्र राज्योत्सवाच्या नावावर उधळपट्टी सुरु केली आहे. एकीकडे राजकीय पक्ष आणि कन्नड संघटनांनी प्रमुख चौकांत फलक उभारुन शहराचे विद्रूपिकरण केले आहे. आता जिल्हा प्रशासनाकडून स्वागत कमानी, प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येत आहे. चन्नम्मा यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
दुष्काळामुळे राज्योत्सव साध्या प्रमाणात करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी केवळ मराठीद्वेषापोटी सामान्य जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.